देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मिक्की कोचर यांची निवड



 प्रेस मीडिया लाईव्ह

  अन्वरअली शेख : 

देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मिक्की उर्फ अमरजीतसिंग कोचर यांची नियुक्ती जगन्नाथ शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष यांनी मिकी कोचर यांना नियुक्ती पत्र देऊन देहूरोड शहर अध्यक्षपदी निवड केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून सर्वसामान्य जनतेपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे विचार पोहोचू, 

देहूरोड शहरात 25 वर्षापासून पक्ष टिकवण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी मी जिवाचेरान केले आहे आणि आता पुन्हा पक्षाला या आधुनिक काळात  मी उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहील ,सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर शहराला भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मी आता खंबीर भूमिका घेणार आहे,

देहूरोड शहरवासी यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूरोड शहरात बळकट करून पक्षाचे ध्येय धोरणं सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवणार  असल्याचे प्रेस मीडिया लाईव्ह वृत्तवाहिनीच्या पुणे जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी बोलताना मिक्की कोचर  म्हणाले,

या पूर्वी ही मिक्की कोचर यांनी नऊ वर्ष देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी खंबीर पणे  पार पाडली आहे, मिक्की कोचर यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षाचा आमदार नसताना देखील देहूरोड शहरात पक्ष संघटना मजबूत केली पक्षात सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची  बांधणी मजबूत केली होती, देहूरोड शहरातील मुंबई पुणे महामार्ग रेल्वे पुलावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडी चा प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविला. या पुलावर अपघात होऊन अनेकांचा बळी गेला हा फुल नवीन बांधण्यासाठी अनेक वेळा त्यांनी आंदोलने केली त्यानंतर नवीन पूल तयार करण्यात आला.

यावेळी कैलाश गोरवे यांना विचारले असता गोरवे यांनी  मिक्की कोचर यांची परत शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे यामुळे आम्हा सगळ्यांना परत मोठा बळ मिळाला आहे  कोचर हे निष्ठावंत नेते आहेत सर्व सामान्याचे अडीअडचण नक्की सोडवतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे यापूर्वीही पक्ष वाढवण्यासाठी आमचे रफिक शेख, रेणू रेड्डी, शिवाजी दाभोळे, महेश केदारी, गणेश कोळी, किशोर जगताप, असे अनेक कार्यकर्तानी मागील पंचवीस वर्षापासून पक्षासाठी काम केले आहे या सर्वांचे मोठे योगदान आहे आम्ही सर्वांनी परत जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे (बापू) यांना विनंती केली होती की परत एकदा मिक्की कोचर यांची आपण नियुक्ती करावी आणि आमच्या मागणीला आज यश मिळाले असे मत कैलाश गोरवे यांनी वक्त केले

यावेळी रफीक शेख, कैलास गोरवे ,गणेश कोळी ,रेणू रेड्डी ,शिवाजी दाभोळे ,महेश केदारी, अँथनी स्वामी ,किशोर जगताप ,गोविंद राऊत, देवराज स्वामी ,सुरेश भारस्कर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post