सातारा- पुणे महामार्गावरील झालेल्या टेम्पो व ट्रक च्या भीषण अपघात तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू



प्रेस मीडिया लाईव्ह : 

शिरवळ  : सातारा- पुणे महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाजवळ टेम्पो व ट्रकचा  झालेल्या भीषण अपघात  तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झालेला आहे.मंजुनाथ यल्लाप्पा कावली (वय -२८, पामलदिनी, ता. गोकाक, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक), आंनद गुरुसिद्ध गंगाई (वय ३०, रा पामल दिनी, ता. गोकाक, जिल्हा बेळगाव. राज्य कर्नाटक), नायकप्पा सत्यप्पा नायकर (वय ३४, उज्जनकोप, ता. रामदुर्ग, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक) अशी मृत व्यक्तीची नावे असून, घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झालेली आहे.



बूधवार दिनांक . १३ रोजी रात्री दहाच्या सुमारास सातारा- पुणे महामार्गावरील धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटे वस्ती समोर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून टेम्पोने जोराची धडक दिल्याने मालट्रकमधील ३ जण जागीचं ठार झाले. कर्नाटक बेंगलोर येथून शेतीचा माल मुंबई, वाशीकडे घेऊन जाणारा टेम्पो धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या मोटे वस्ती समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रकला पाठीमागे जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे दबला गेला. यात मंजुनाथ यल्लाप्पा कावली, आंनद गुरुसिद्ध गंगाई, नायकप्पा सत्यप्पा नायकर पूर्णपणे दबले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत. 

चालक, मालकासह क्लिनरचा मृत्यू

कर्नाटकातून पुण्याकडे निघालेल्या आयशरमध्ये स्वत: मालकासह अन्य एक चालक आणि क्लिनर, असे तिघेजण होते. अपघातावेळी स्वत: मालकच टेम्पो चालवत होता, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या भरधाव आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. अपघातात तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. सकाळी मृताचे कुटुंबीय शिरवळमध्ये दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post