पुणे फेस्टिव्हल मध्ये व्हिटेंज बाईक रॅली चा प्रवास सुरू झाला



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे फेस्टिव्हल मध्ये  व्हिटेंज बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.   माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री मितेश घट्टे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .  नव्याने रंगरुपात सजलेल्या ६० वर्ष जुन्या दुचाकी त्यात सामिल होत्या. आजच्या आधुनिक जगात त्यांचे तंत्रज्ञान जुने झाले असेल, मात्र आमच्या मागच्या पिढीतली तरुणाई या दुचाकींसाठी पागल दिवाने होते. आजचे त्यांचे मालक पण या अपूर्वाईने भारावलेले होते. व्हिक्टरी थिएटरचे मालक श्री फारुक चिनॉय यांनी त्यांच्या तारुण्यातील दुचाकी प्रेमाच्या आठवणी जागवल्या.  

        स्वातंत्र्य संग्रामात साक्षीदार असलेल्या व्हिक्टरी ( त्यावेळचा कॅपिटल सिनेमा ) थिएटरच्या प्रांगणात या रॅलीला झेंडा दाखवण्याची संधी मिळाली. पुणे शहरात ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतींना भेट देत या व्हिटेंज रॅलीचा प्रवास होणार आहे. पुणे फेस्टिवलचे संयोजक श्री अभय छाजेड, प्रसन्न गोखले आणि श्रीमती दारुखानावाला यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम संपन्न होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post