कबड्डीला व्यावसायिक खेळ म्हणून ओळख. डॉ संजय रोडगे.

 नूतन विद्यालय ,प्रिन्स इंग्लिश स्कुल,शां.न. वि.देवगाव, वालूर विजयी.तालुका शालेय क्रीडा स्पर्धेत 39 संघाचा सहभाग.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

डॉ. शिवाजी शिंदे : परभणी.

सेलू : प्रो कबड्डी मुळे मराठमोळ्या कबड्डी खेळाला क्रिकेट प्रमाणे व्यावसायिक ओळख मिळाली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली असून कबड्डी कडे व्यावसायिक खेळ व करिअर म्हणून पाहायला हवे असे प्रतिपादन डॉ संजय रोडगे यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनाय पुणे, जिल्हाक्राडाधिकारी कार्यालय परभणी, पं.स.गटशिक्षणाधिकारी कार्यालय व श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ता. 7 सप्टेंबर रोजी येथील एल.के.आर.आर. प्रिंन्स इंग्लिश सेलू येथे आयोजित तालुका स्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .संजय रोडगे होते. या प्रसंगी उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,  प्रमुख पाहुणे अनिकेत पालेपवाड ,  प्राचार्य कार्तिक रत्नाला,  तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, मुख्याध्यापक विजयसिंह राजपूत, मधुकर काष्टे , यांची उपस्थिती होती. 

राष्ट्रीय भावना खेळातून रूजतात -उमेश राऊत

आपण एक आहोत हा विचार सांघिक खेळातून रूजतो व त्याचे पुढे राष्ट्रीय भावनेत रूपांतर होते त्या मुळे विद्यार्थ्यांनी खेळातून करिअर करावे व देशासेवा करावी असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी केले या स्पर्धेत तालुक्यातील १४,१७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकुण 39 संघातील 18 प्रशालेचा सहभाग नोंदवला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे , सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर सुरज शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रो.कबड्डी खेळाडू राहुल घांडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंतिम फेरी सामन्यात १४ वर्षे मुलाच्या गटात : प्रथम:-नूतन विद्यालय सेलू ,व्दितीय:- न्यु. मॉर्डन इंग्लिश स्कुल सेलू.१४ वर्षं मुली गटात: प्रथम:- एल. के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कूल. व्दितीय:- कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू.१७ वर्षे मुले च्या गटात:- प्रथम: नूतन विद्यालय सेलू, व्दितीय:-शां.न.आ.शा.वालूर ,१७ वर्षे मुली गटात:प्रथम:-:-शां.न.वि.देवगाव फाटा.व्दितीय: नूतन कन्या प्रशाला सेलू, १९ वर्षे मुले : प्रथम:-शां.न.वि.आ.शा.वालूर,  व्दितीय: एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू.१९ वर्षे मुली: प्रथम: एल.के.आर.आर.प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू.व्दितीय: न्यु.हायस्कुल सेलू.पंच म्हणून प्रशांत नाईक, राजेश राठोड, संगीर फारोकी, पवार शुभम, राहुल घांडगे. प्रो कबड्डी राष्ट्रीय खेळाडू ,विशाल ढवळे,वेदांत बोचरे,बबलु घांडगे,ज्ञानदीप घांडगे,गोविंद झमरे,यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post