निखिल बनगे याची ऑस्ट्रेलियातील यु.एन. एस.डब्लु. युनिव्हर्सिटी मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय  विभागाकडून परदेशातील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये उच्च शिक्षणा साठी शिष्यवृत्ती *(National overseas Scholarship)* देणेत येते. 

    इचलकरंजी महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचा मुलगा निखिल बनगे याला केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय (NOS) विभागाकडून रुपये ८४ लक्ष इतकी १०० टक्के शिष्यवृत्ती मिळाली असून ऑस्ट्रेलियाच्या यु.एन. एस.डब्लु. या आंतरराष्ट्रीय  स्तरावर १९ वे मानांकन असलेल्या युनिव्हर्सिटी मध्ये *मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सायन्स या अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे.

  निखिलचे प्राथमिक शिक्षण दत्ताबाळ विद्या मंदिर कोल्हापूर, माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी , डिप्लोमा संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे आणि बी टेक  जे.जे. मगदुम इंजिनिअरिंग कॉलेज जयसिंगपूर येथे झालेले आहे.

             तसेच परदेशी उच्च शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असलेली पी.टी.ई. ही परीक्षा उत्तीर्ण होणेकरीता त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी व संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी महालक्ष्मी ॲकॅडमी कोल्हापूरचे प्रा.अभय केळकर यांचे महत्वपूर्ण असे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले  आहे.

       यासाठी जनरल कामगार संघ (इंटक) इचलकरंजीचे  पदाधिकारी आणि माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांचेसह माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या माध्यमातून खासदार धैर्यशील माने यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post