राज्य प्राथमिक शिक्षक संघ हातकणंगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाचे नियोजन सभा संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह 

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हातकणंगलेची 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्च्याच्या नियोजनाची सभा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री एन वाय पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व संघटनांचा शासनाच्या विरोध मोर्चा आयोजित केला आहे तरी हातकणंगले तालुक्यातून जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आव्हान शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री शशिकांत पाटील सर यांनी केले तालुक्यातून जवळजवळ 800 शिक्षक उपस्थित राहतील असे हे जिल्हा कोषाध्यक्ष अरुण साळके सर यांनी सांगितले संघाचे सरचिटणीस माननीय अधिकराव पाटील सर यांनी केंद्र स्तरावर गाड्यांचे नियोजन केले आहे असे सांगण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील 800 शाळा बंद होणार आहेत, कंत्राटी पद्धत बंद करावी ,शिक्षकांना आम्हा फक्त शिकवू द्या ,शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा ,गोरगरीब मुलांना शिकवू द्या ,असे अनेक मागण्यांसाठी सदर मोर्चा असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय एन वाय पाटील सर यांनी सांगितले

    त्यावेळी तालुका संघाचे कार्याध्यक्ष माननीय सुरेश भानुसे सर यांना सुजित मिणचेकर फाउंडेशन चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी महिला अध्यक्ष सोनाली परीट ,सरचिटणीस वर्षा कवडे ,कार्याध्यक्ष फरजाना शिकलगार, कोषाध्यक्ष सुजाता गुरव ,विजय चौधरी, सुखदेव पाटील ,इंद्रजीत कदम, सुरेश भानुसे ,प्रशांत पाटील, अरुण साळके, सरदार पाटील ,राजू संकपाळ ,प्रदीप माने, राहुल शेंडगे ,सायली तांबवेकर, व सर्व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते शेवटी आभार श्री सुखदेव पाटील सर यांनी मानले

   अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे

Post a Comment

Previous Post Next Post