पुणे : मंगला टॉकीज परिसरात गुन्हेगाराची टोळक्याने भररस्त्यात मध्यरात्री कोयते व तलवारीने सपासप वार करून निर्घुन हत्या



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे :   मंगला टॉकीज परिसरात गुन्हेगाराची टोळक्याने भररस्त्यात मध्यरात्री कोयते व तलवारीने सपासप वार करून निर्घुन हत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे. नितीन मोहन म्हस्के (वय २६, रा. ताडीवाला रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. .

 याप्रकरणी सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या (वय ३२), मलिक कोळ्या उर्फ तुंड्या इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवळे, आकाश गायकवाड उर्फ चड्डी) (सर्व. रा. ताडीवाला रोड) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सतीश आनंदा वानखेडे (वय ३४, ताडीवाला रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 


या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के तसेच सागर उर्फ यल्ल्या यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहेत. ते वर्चस्व वादातून वाद असल्याची माहिती आहे. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या टोळ्याही आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी कोरेगांव पार्क परिसरात नितीन म्हस्केने सागर उर्फ यल्ल्या व साथीदारांवर खूनी हल्ला केला होता. याप्रकरणात कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post