पत्रकारांच्या प्रश्नावर व्हॉइस ऑफ मीडियाचे जोरदार धरने आंदोलन.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी परभणी.

परभणी : पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणाºया मानधनासाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात या प्रमुख मागणीसह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, दि.३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानावर जोरदार एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात व्हॉइस आॅफ मीडिया परभणी जिल्हा शहर कार्यकारिणीसह सर्व तालुक्यांचे प्रतिनिधी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनस्थळी भेट देवून जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी निवेदन स्विकारले. तसेच संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास ही निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा पत्रकारांना पत्रकार म्हणून शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात यावे. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यात यावी. माहिती महा संचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत ते देण्यात यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियो आणि सोशल मीडियात काम करणाºया पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली. या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत. अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबवून त्यांना नियमानुसार जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परभणी शहरासह सर्व तालुक्यांचे व्हॉईस आॅफ मीडीयाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनावर व्हॉईस आॅफ मिडीयाचे राज्य कार्यवाहक सूरज कदम, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कार्याध्यक्ष प्रवीण चौधरी, कैलास चव्हाण, जिल्हा संघटक भास्कर लांडे, प्रसिध्दी प्रमुख सुधीर बोर्डे, उपाध्यक्ष शिवाजी वाघमारे, शहराध्यक्ष अक्षय मुंडे, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा, तालुकाध्यक्ष कचरूलाल बारहाते, भागवत चव्हाण,  आनंद ढोणे पाटील, अन्वर शेख लिंबेकर, सुरेश जंपनगीरे, प्रविण देशपांडे, विजय कुलकर्णी,शेख मुबारक,प्रदीप कांबळे, अरूण रणखांबे, सोमनाथ स्वामी, गुणवंत सराफ, संदिप ढाले, दिलीप बोरूळ, प्रमोद तारे, वसंत मांडे, विलास बारहाते, मंदार कुलकर्णी,रवि मानवतकर,भैय्यासाहेब गायकवाड, आलिम खान, डॉ.एम.ए. रिझवान, हाफीज बागवान, रमेश यादव, संदिप माहुरकर, मनोज टाक, शंकर देशमुख, किरण स्वामी, महादेव नरवटे, गणेश निरस, कल्याण वाघमारे, गुणवंत कांबळे, एस.जी. पांचाळ, सचिन रायपत्रीवार, राम रेघाटे, विश्वंभर खरात, महेश देशमुख, संतोष तायडे, राजू गारकर, शिवबाबा शिंदे,  भुषण मोरे, बी.जी. बद्दर, लक्ष्मण कच्छवे, नारायण सोनटक्के, संदिप माहुरकर, रामप्रसाद दराडे, महेश देशमुख, मनोज टाक, संतोष तायडे, प्रदिप फाले, संग्राम खेडकर, अंकुश कांबळे, वसंत गेजगे, प्रदिप गौरशेठे, वामनराव ढोबळे, लक्ष्मण कच्छवे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post