पेट्रोल पंपावर फसवणुकीचा धंदा जोरात.कारवाईची मागणी.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-शहरात आणि उपनगरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आहेत काही ठिकाणच्या पेट्रोल भरताना ग्राहकाचे लक्ष नसताना आपल्या हात चलाखीने एक-दोन पॉइंट सरास मारतात.एक सारखे पेट्रोल सोडून  मध्येच थांबून परत सोडतात.काही ठिकाणी झिरो न करताच पेट्रोल सोडून ग्राहकांची फसवणूक करतात.अशा फसवणूक करण्यारया पेट्रोल पंपावर असणारया कर्मचारयांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

असाच प्रकार सांगली येथील एका व्यक्तीने उघडकीस आणला सांगली येथे झुलेलाल मार्केट ते सांगली सिव्हील दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपावर एक ग्राहक आपली चार चाकी (गाडी नं.KA-14 M 9240)घेऊन टाकी फुल्ल करण्यास सांगितले असता त्या कर्मचारी महिलेने प्रथम पाचशेचे टाकतो असे सांगून प्रथम पाचशेचे टाकले .नंतर आता टाकी फ़ुल्ल करतो म्हणुन मशीनवर झिरो न करताच पेट्रोल सोडुन 2900 रु.चे पेट्रोल सोडुन टाकी फुल्ल करून त्या महिला कर्मचारी त्या ग्राहकाकडे 3400 रु.ची मागणी केली.त्यानंतर तो ग्राहक ऑनलाईन पेंमेट करू लागला असतानाच तेथे उपस्थित असलेल्या एका जागरुक व्यक्तीने या महिलेने फक्त 2900 रु.चेच पेट्रोल टाकले आहे.ती तुम्हाला 500 रु.जादा फसवणूक केली आहे.

हा सर्व प्रकार समजताच त्या ग्राहकाने त्या महिलेला पटवून देण्याचा प्रयत्न करूनही दाद लागू दिली नाही.मशीनवर चेक करताच सबंधित महिला कबूल होऊन 2900रु.द्या असे मी तुम्हाला सांगितले.जर त्या व्यक्तीने सांगितले नसते तर त्या ग्राहकाने 3400रु.ऑनलाईन पेंमेट केले असते तर त्या कर्मचारी महिलेने 500रु वरचेवर मिळवले असते.अशा फसवणूक करण्यारयां पेट्रोल पंपाच्या (मालकांची नव्हे) कर्मचारयांची चौकशी करून कारवाईची मागणी ग्रांहकांतुन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post