राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय "कोल्हापूर येथे 15 दिवसांची आंतरवासिता संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठवडगाव येथे बी.एड प्रथम वर्षातील सेमिस्टर दोन मधील शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत गट क्रमांक चार "मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय "कोल्हापूर येथे 15 दिवसांची आंतरवासिता संपन्न झाली.

ही आंतरवासिता दिनांक 10/07/2023 पासून सुरू करण्यात आली होती. या आंतरवासितादरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययन अध्यापन बरोबर वेगवेगळे उपक्रम राबवले. विविध खेळ , स्पर्धा यामध्ये निबंध स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा ,नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा यासारखे विविध उपक्रम राबवले होते .सोमवार दिनांक 24 /07 /2023 रोजी अंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला 

.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.माननीय श्री. व्ही .बी .डोने सर,तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ . निर्मळे आर .एल., प्रा. चरणकर जे .एस. तसेच इतर उपस्थितीमध्ये प्रा. सोरटे एस. के,प्रा. शिरतोडे व्ही. एल .,प्रा. सौ. सावंत ए .पी. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंतरवासिता गटातील छात्राध्यापक छात्राध्यापिका विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते .या गटाची शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिक प्राध्यापिका चरणकर जे. एस .यांच्या  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसमा शेख व ऐश्वर्या धामोडकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायत्री कुंभार यांनी केले. कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आंतरवासितेमध्ये छात्राध्यापक शिकवण्याचे काम करत असले तरी ते स्वतः अनुभवातून खूप काही शिकत असतात. शाळेमध्ये आलेले अनुभव हेच भावी शिक्षक होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शक ठरतात, असे मेन राजाराम हायस्कूलचे प्राचार्य श्री. डोने सर यांनी मार्गदर्शन केले. मेन राजाराम हायस्कूलच्या पर्यवेक्षक पत्रावळे मॅडम यांनी बी.एड छत्राध्यापकांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

आंतरवासिता मधील अभिरुप छात्र मुख्याध्यापिका सोनाली भाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले .तसेच छात्राध्यापक रोहन फराकटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी छात्र अध्यापक पारितोष हुजरे यांनी आभार मानले अशा प्रकारे ही पंधरा दिवसांची आंतरवासिता अगदी व्यवस्थित रित्या पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post