इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

   इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार  दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी  *लोकमान्य बाळ गंगाधर टिळक*  यांच्या पुण्यतिथीनिमित्त   शहरातील राजवाडा चौक येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास  तसेच *लोकशाहीर आण्णाभाऊ साठे* यांच्या जयंती निमित्त शहरातील किसनराव आवळे मैदान, शहापूर रोड येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास सहा. आयुक्त केतन गुजर यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.


     याप्रसंगी माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे, अब्राहम आवळे, विद्युत अभियंता संदीप जाधव,उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, रेकॉर्ड किपर संजय सुभेदार, सदाशिव शिंदे, संजय शेटे, संभाजी पोवार, संग्राम भोरे, मारुती जाधव, महेश बुचडे, दिलीप मगदुम आदी उपस्थित होते.


     


      

Post a Comment

Previous Post Next Post