उरण येथील चिटफंड घोटाळ्यात पोलीसांचे हात ओले..

  नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

उरण येथील कोट्यावधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील महिला आरोपी व तीच्या सहका-यांशी पोलीसांचे धागेदोरे उजेडात आले आहेत. संशयीत महिला आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीसांच्या तपासात चिटफंड आरोपींना नवी मुंबई पोलीस दलामधील तीन पोलीस अधिका-यांनी मदत करुन त्यांच्याकडून लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली.

आयुक्तांच्या या कारवाईमुळे बुधवारी रात्री पोलीस दल हादरले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला राज्याच्या पोलीस महासंचालकांनी भेट देऊन काही तास उलटल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उरण येथील चिटफंड घोटाळ्यातील संशयीत महिला आरोपी सुप्रिया पाटील आणि तीच्या सहका-यांनी दिलेल्या कबूली जबाबावरुन तीन पोलीसांना घरी बसावे लागले. गुन्हे अन्वेषण शाखा क्रमांक २ चे पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील, पोलीस उपनिरिक्षक योगेश पाटील आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप सोनवलकर अशी कारवाई झालेल्या पोलीस अधिका-यांची नावे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post