प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे.या अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री.अंबादास दानवे यांनी वृत्तपत्र व्यावसायिक विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ असावं अशी पावसाळी अधिवेशनात केली आहे.
ते पुढे म्हणाले की,वृत्तपत्र विक्रेता हा तहान,थंडी ,ऊन,वारा आणि पाऊस याचा विचार न करता सकाळी सकाळी वृत्तपत्र महाराष्ट्रात नव्हे तर देशात वृत्तपत्र विकत असतो.त्यांच्या साठी वृत्तपत्र विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी सरकारने याचा विचार करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की,मागच्या वेळी ही मागणी केली होती.
या बाबतीत सरकारने थोडे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.वृत्तपत्र विक्रेत्या साठी काम करण्यारया महाराष्ट्रा राज्य वृत्तपत्र विक्र्रेता संघटना या एकमेव शिखर संघटनेच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून वृत्तपत्र विक्र्रेता कल्याणकारी मंडळासाठी प्रयत्न सुरु आहेत.शासन दरबारी अनेकदा निवेदने देऊन आंदोलनेही केली मात्र अद्याप या बाबत शासनाने निर्णय घेतला जात नव्हता.राज्यात सुमारे चार लाख वृत्तपत्र विक्र्रेते काम करीत आहेत.वृत्तपत्र संघटनेचे पदाधिरीही संबंधितांकडे पाठ पुरावा करीत होते.आज पावसाळी अधिवेशनात श्री.अंबादास दानवे यांनी वृत्तपत्र विक्रेत्या साठी कल्याणकारी मंडळचा प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधून घेतले.यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Good news
ReplyDeleteThanks