लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांचा सर्व पक्षिये व नागरीकांकडून सम्मानित

 जिन्सी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक शेख अशफाक याला लाच घेताना अटक केली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

औरंगाबाद (प्रतिनिधी ) : 

जुनाबाजार येथील लाचलुचपत प्रतिबंधक  पथकाचे अधिक्षक संदीप आटोळे यांचा जिन्सी परिसरातील नागरीकांकडून सत्कार करून सम्मानित करण्यात आले आहे.   जिन्सी पोलीस ठाणेचे पोलीस  उपनिरीक्षक शेख अशफाक याला एक लाखाची रिश्वत घेताना लाचलुचपत पथकाने 15 जूलै रोजी सापळा लावून अटक केली होती अशफाक अटक होताच जिन्सी परिसरातील नागरीकांनी आनंद व्यक्त करीत लाचलुचपत पथकाचे अभिनंदन केले आहे.


18 जूलै रोजी परिसरातील नागरीक लाचलुचपत कार्यालयात गाठून येथील अधिक्षकसह पथकातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला आहे.

यावेळी विजयराव साळवे,मौलाना एकबाल अन्सारी,मौलाना नुरी,सय्यद शाहबुद्दीन,अलीमोद्दीन खान,शेख रफीक भाईजी,शेख मुकीम,राजु बिंदरा,शेख वसिम,शेख अकबर,शेख अनवर,शकील कुरेशी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मौलाना नुरी यांने सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधचे अधिकारी हे चांगले काम करीत आहे.अशीच कारवाई सतत लाचखोरांविरोधात सतत ठेवावे असे यावेळी सांगितले आहे.

शिवसेनेचे विजयराव साळवे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे अभिनंदन केले आहे.जिन्सी पोलीस ठाणेचे उपनिरीक्षक अशफाक शेख यांनी अलीमोद्दीन खान,शेख रफीक यांना नाहक त्रास देऊन अटक करण्याची धमकी देत पैशेची मांगणी करीत होता नाहक त्रासाला कंटाळून सरळ एसीबीत तक्रार करून या पोलीस अधिकारीचा बंदोबस्त केला आहे.

अशीच एसीबीची धडकन कारवाई राहिली तर खरंच भ्रष्टाचाराचा नायनाट होईल असे यावेळी म्हणटले आहे.

शेवटी शेख रफीक यांनी सांगितले की,मीच पहिल्यापासून पोलीसांचा टार्गेट होता आता तर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक  कार्यालयात तक्रार देऊन लाच घेताना अटक केली आहे.परंतु मला कधीही हे पोलीस दुसऱ्या पोलीसा मार्फत मला काही करू शकतो मला यांच्यापासून जिवाला धोका असून पोलीस आयुक्तांना मला संरक्षण दयावे असे सांगितले आहे.शेख रफीक यांनी शेवटी सांगितले की कोणी कोणत्याही कामासाठी अधिकारी लाचेची मांगणी करीत असेल तर थेट लाचलुचपत प्रतिबंधक जुनाबाजार येथील कार्यालयात *भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास* 

*टोल फ्री क्र:- 1064

*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:-* 9923023361,यावर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post