विशेष वृत्त : प्रत्येक पालकांनी आपली मुलं शिक्षणाच्या नावाखाली काय करतात या कडे लक्ष दिले पाहिजे.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :                               

  कोल्हापूर -प्रत्येक आई वडील  आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी रात्रदिवस कष्ट करून बाहेर गावी  शिक्षणासाठी पाठवतात. त्यांना आपण मागेल ते देत असतो कारण आपली मुलं शिकून चांगली नोकरी लागून स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी.आपण कामात असल्यामुळे आपली मुलं शिकतात की आणि काय करतात या कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. प्रत्येक पालकांना वाटते की  जे आपल्याला मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे त्या साठी पालकांना मुलांच्या साठी काय करु आणि काय नको होते याचाच फायदा आपली मुलं घेतात.

आजकालची मूलं भावना शून्य झाली आहे.आपल्या मजेसाठी , स्वार्थासाठी, चैनी साठी ही मुलं स्वतःचा आई वडीलांचा सुध्दा विचार करीत नाहीत.काही आई वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी नावाजलेल्या शहरात पाठवतात.या मुलांनी आपल्या आई वडीलांची जाणीव ठेवली पाहिजे.मुले परगावात काय करतात ते आई वडीलांना कसे समजणार ? ते  फक्त पयसे पाठवायचे काम करणार .या वयात शिकायचे सोडुन नकोते धंदे कशाला मुलांनी करायचे यामूळेच ही पिढी बरबाद होत चालली हे मात्र नक्की .हल्ली म्यत्रीच्या नावाखाली मुलींची फसगत होत आहे.त्या अत्याचाराला बळी पडून आपला मौल्यवान जीव गमावुन बसतात. आज पुण्या सारख्या शहरात शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ठिकाणी आजची पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत चालली आहे. मित्रांच्या संगतीत बाहेर फिरायला जाणे,नकोती व्यसने करून पबच्या नावाखाली तोकडे कपडे घालून रात्रभर दारु पिऊन नाचगाणी ,दंगा मस्ती च्या नावाखाली आपले शौक करून आपण कोणा बरोबर बाहेर जातो. अनोळखी मित्रा बरोबर जास्त विश्वास ठे ऊन कधी कधी घात केल्या शिवाय रहात नाही हे देखील मुला मुलींनी लक्ष्यात घेतले पाहिजे.आज कालची काही मुलं मुलींनी कोणावरही विश्वास ठेऊन नकोत्या वयात नकोत्या थेरं करून आपलं आयुष्य आणि कुंटुंब बरबाद करत आहेत.

तुम्हाला आई वडील बाहेर पाठवितात कारण आपली मुलं शिकून मोठी अधिकारी व्हावीत.आपल्या घरच्यांवर विश्चास ठेवा .तुमचा बळी जाऊ देऊ नका.आई वडीलांना आपली मुलं महत्वाची असतात.मुलीने  अधिकारी होण्यासाठी रात्र रात्र जागून अभ्यास करून अधिकारी झाल्यावर गावाने सत्कार करून मोठे कौतुक केले.अन तीच गुणी मुलगी अर्ध्यावर सोडून गेली तेव्हा तिच्या आईने तिच्या सोबत मलाही सरणावर जाळा म्हणत कोपरगावच्या दर्शना पवारच्या आईची विणवनी .नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकाने पास होऊन आणि वनक्षेत्र अधिकारी म्हणुन निवड झालेली कोपरगाव जि.अहमदनगर. येथील दर्शना पवार (वय 26).ही मुलगी पुण्यात वेल्हे राजगडाच्या पायथ्याशी मित्राबरोबर ट्रेकिंगला म्हणून गेली आणि परत आलीच नाही.आणि तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला. पुण्यात एका संस्थेने तिचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते त्या साठी ती  पुण्यात सिंहगड रोड येथे सहेली कडे रहाण्यास गेली होती तेथे एका मित्रा बरोबर राजगडला फिरायला जाते असे म्हणून सहेलीला सांगुन गेली असता तिचा तिकडेच खून झाल्याचे समजले.तिचा कुजलेला मृतदेह ,मोबाईल ,पर्स राजगडाच्या पायथ्याशी मिळून आल्या .तसेच तिचा मित्र गायब झाल्याने त्याच्यावर संशय असून पुढ़ील तपास पुणे ग्रामीण पोलिस करीत आहेत.कोपरगावची दर्शना ही अभ्यासात हुशार होती.पण घराच्या बाहेर पडल्यावर मुलीनी कोणावर किती विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहेत. म्हणुन प्रत्येक पालकांनी आपली मुलं-मुली शिक्षणाच्या नावाखाली काय करतात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post