नवी मुंबई पोलीस ट्राफिक तालुका पोलीस स्टेशन यांनी नागरिकांचा रोजचा होणारा नाहक त्रास कमी करावा.

 मुंबई पुणे हायवे जुना रोड आजिवली शेडुंग पेट्रोल पंप मुले वाहतुकीस अडथळा


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

सध्या अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी वाढले असून जुना मुंबई हायवे रोड अथवा नवीन मुंबई पुणे हायवे रोड अपघाताच्या मालिका वाढतच असून त्यात कमतरता होताना दिसतच नाही . महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आजिवली येथे रस्ते सुरक्षा अभियान व जन जागृती मोहीम या विषयावर प्रबोधन.....आत्ताच झाले परंतु हे काम ट्राफिक पोलीस यांच्या माध्यमातून ट्राफिक सुरळीत दिसून येत नाही . 


आजीवली व शेडून पेट्रोल पंप रोज संध्याकाळी अशा पद्धतीने ट्राफिक पंपावर डिझेल टाकण्यासाठी गाड्यांची लाइनच लागते त्यामुळे वाहतूक ज्याम होते  ही हद्द तालुका पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत येत असून रोजच्या रोज प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे व ट्रॅफिक ज्याम मुळे प्रवास करणारे नागरिक वैतागले आहेत.  जे कंटेनर उभे राहतात रस्त्यावरती याची सोय पेट्रोल पंप मालक यांनी जागा घेऊन पार्किंग साठी जागा तयार करून द्यावी . केवळ आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी  लोकांना का त्रास द्यायचा याचा विचार करावा . या बाबतची  दखल नवी मुंबई पोलीस ट्राफिक तालुका पोलीस स्टेशन यांनी घ्यावा व नागरिकांचा रोजचा होणारा नाहक त्रास कमी करावा. 

Post a Comment

Previous Post Next Post