श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ ,अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठवडगाव येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.



प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ ,अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठवडगाव येथे Janbhagidari Activity Events For TEIs to Commemorate India' s G20 Presidency. अंतर्गत दिनांक 2 जून ते 15 जून 2023 पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले.  FLN ( Foundational literacy and numeracy _ म्हणजेच मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर कविता लेखन व वाचन,स्लोगन, व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. NIPUN BHARAT - National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy.



म्हणजेच बालकांमध्ये मुलभूत वाचन,लेखन, समज आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे. मुलांना साक्षर बनवणे. मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान हेच निपुण भारत मिशन कार्यक्रमाचे लक्ष आहे. ते या स्लोगन मधून कौशल्य , धोरणे व योजना चा महत्वपूर्ण उदिष्टे दिसुन येते. ज्याद्वारे विद्यार्थी वाचणे, बोलणे, लिहिणे, अर्थ लावणे यासाठी सक्षम होतील. भविष्यात विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आणि विद्यार्थ्याना शाळेत टिकून ठेवण्याचा विश्वास देते.

G20 या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळी काढून सहभाग दर्शवला.

Gender sensitization

Mental well being

Teacher student relationship 

या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन घेण्यात आले.सर्व  विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पोस्टर तयार केले. पोस्टर चे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे आर. एल मॅडम यांच्या हस्ते झाले.यावेळी निपुण भारत,FLN, व G20 याविषयावर  प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, बी. एड चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अशा प्रकारे कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड पेठवडगाव येथे हे सर्व उपक्रम राबविण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post