अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेल्या प्रकरणी आरोपीस तीन दिवसांची कोठडी.

        

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर - करवीर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून नेल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी इमदाद नायकवडी (रा.जवाहरनगर ,कोल्हापूर).या संशीयीत युवकास अटक करून  त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. या प्रकरणी पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.इमदाद नायकवडी हा जवाहरनगर परिसरात रहात असून त्याने आपला मित्र सलमान पठाण यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला पळवुन नेले होते.या प्रकरणी कोल्हापूरातील काही संघटना करवीर पोलिस ठाण्यात एकट्र येऊन संबंधित आरोपीस अटक करून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी पीडीत अल्पवयीन मुलीची सुटका    करून संशयीत आरोपी इमदाद नायकवडी याला अटक केल्याचे सांगितले.त्या नंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले होते.करवीर पोलिसांनी आज नायकवडी याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पुढ़ील तपास पोलिस महिला उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post