शासन आपल्या दारी ,आणि नोकरदार ,प्रवासी एसटीची वाट पाहत उभा एसटी स्टँड वरी .

    एसटी महामंडळाचे ढ़िसाळ नियोजनाचा नोकरदांना फटका ?    


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर-आज "शासन आपल्या दारी "हा उपक्रम कोल्हापूरात होत आहे.या कार्यक्रमासाठी लाभार्थ्याना ने -आण साठी एसटी च्या बसेस आरक्षीत केल्या आहेत.कोल्हापूर डेपोतून 65 तसेच वेगवेगळ्या डेपोतून अशा अंदाजे 700 हून अधिक एसटी बस ची सोय केली आहे.त्या मुळे नेहमी जाणारया एसटीच्या फेऱ्या कमी करुन कार्यक्रमासाठी एसटी बस दिल्या आहेत.

त्या नेहमी एसटी ने प्रवास करणारा नोकरदार वर्ग ,प्रवाशी ताटकळत एसटी स्टँडवर एसटी ची वाट पाहत उभे होते.वेळेत नोकरीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अन्य कोणताही पर्याय नव्हता.एसटी च्या फ़ेरया रद्द केल्यामुळे या सर्वाना फटका बसला आहे.एसटीची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या मर्जी प्रमाणे गाड्या सोडण्यात येत होत्या.एसटी महामंडळाने अगोदर नियोजन करणे आवश्यक होते असे नोकरदार वर्ग,आणि प्रवाशी वर्गातुन बोलले जात आहे.काही ठिकाणी वाहतूक नियंत्रक प्रवाशांना तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या  ठिकाणी मिळेल त्या वाहणाने जावा कारण एसटया कमी आहेत.असे सांगण्याची वेळ वाहतूक नियंत्रकावर आली.आजच्या दिवशी एसटी      महामंडळाने शासन आपल्या दारी आणि नोकरदार , प्रवाशी वारयावरी म्हणण्याची वेळ आली.

Post a Comment

Previous Post Next Post