क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहीणारयावर लेखकावर कठोर कारवाई करुन "इंडिक टेल्स आणि हिंदु पोस्ट "या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. 

'सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय' अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल 'इंडिक टेल्स' च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा मी तीव्र निषेध करीत आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे.ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.

तरी,सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.


(जिल्हाध्यक्ष)

Post a Comment

Previous Post Next Post