इचलकरंजी भाजपाची आगळीवेगळी व लक्षणीय टिफिन बैठक उत्साहात संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी  :    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली याबद्दल इचलकरंजी शहरामध्ये मोदी @९ अंतर्गत जनसंपर्क टिफिन बैठक व सर्व मोर्चा संमेलन इचलकरंजी पंचगंगा वरद विनायक गणपती मंदिर येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .

    

        भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे सर्वांमध्ये जिव्हाळा आणि आपुलकी आहे आज हीच आपुलकी पुन्हा दिसून आली. पंचगंगा वरद विनायक गणेश मंदिर इचलकरंजी नदीकिनारी निसर्गरम्य ठिकाणी मोदी @9 कार्यक्रमांतर्गत जनसंपर्क टिफिन बैठक व सर्व मोर्चा संमेलन घेण्यात आले.या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या सेवा, सुशासन,जनकल्याण योजना याविषयी वैचारिक चर्चा करण्यात आली. या बैठकीला घरून आणलेल्या डब्यातील जेवणाची मेजवानी मिळाली आणि चर्चा रंगत गेली पक्ष बांधणीच्या संकल्पना एकमेकांना वाढण्यात आल्या आणि  पक्ष बांधणीच्या संकल्पना उत्सहाने फुलत गेल्या संघटना वाढीची नित्सिम भावना प्रत्येकाच्या डोळ्यात चमकत होती.

       या बैठकीत मा.श्री.सुरेशराव हाळवणकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना संभोधित करते वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या ९ वर्ष कार्यकाळातील  लोकभिमुक योजनांच्या सकारात्मक बाबी बद्दल माहिती सांगून मार्गदर्शन केले तसेच पक्ष बांधणीसाठी सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.या जनसंपर्क टिफिन बैठक व सर्व मोर्चा संमेलणासाठी संयोजक म्हणून इचलकरंजी भाजपा सरचिटणीस मा.श्री.अरुण कुंभार ,माजी शिक्षण सभापती मा.श्री.किसन शिंदे ,युवा सरचिटणीस मा.श्री.प्रमोद बचाटे यांनी कार्य  केले. तसेच यावेळी शहराध्यक्ष मा.श्री.अनिल डाळ्या यांनी सर्व आघाडी अध्यक्ष यांना संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी वस्त्रउद्योग महासंघ अध्यक्ष मा.श्री.अशोक स्वामी , माजी उपनगराध्यक्ष.श्री. तानाजी पोवार, माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री.हिंदुराव शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.प्रसाद खोबरे,सौ.विजया पाटील ,माजी उपसरपंच मा.श्री.सुधिर पाटील ,माजी नगरसेवक मा.श्री. दिलीप मुथा, मा.श्री.शहाजी भोसले,मनोज हिंगमिरे ,जहांगिरी पटेकरी मा.श्री.अजित मामा जाधव,मा.श्री,बाबासाहेब कोरे ,मोहन बनसोडे  मा.पै. अमृत मामा भोसले, मा.श्री.रणजित अनुसे , मा.श्री. प्रदिप धुत्रे, मारुती पाथरवट ,राजू चव्हाण वैशालीताई नायकवडे, सौ.अश्विनी कुबडगे ,विनोद कांकानी ,मोहन कुंभार , सुकुमार पाटील ,जयकुमार कडाप्पा ,शशिकांत मोहिते ,दिपक राशिनकर ,पांडुरंग म्हातुकडे,महेश पाटील ,उमाकांत दाभोळे , अरविंद शर्मा,दिपक पाटील,शुभम बरगे, प्रवीण पाटील,प्रदिप मळगे ,भाजपा महिला अध्यक्ष सौ.पूनम जाधव, सौ.योगिता दाभोळे,सौ.नीता भोसले, निर्मला मोरे , शबाना शहा ,संगिता कांबळे, मधुमती तोरगुले, विनोद कोराणे ,संगीता घोरपडे,बी.डी.पाटील,संतोष कोटगी ,संतोष शेळके ,अरविंद चौगले,लालचंद पारिक ,भानुदास तासगावे ,आप्पा रावळ,राहुल तेलसिंगे,सतीश भस्मे,शिवानंद रावळ,इलाई नायकवडे,राजकुमार पाटील ,सतीश नर्मदे व इतर सर्व भाजपा आघाडी व मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post