आदर्श सरपंच पुरस्कार हा यांच्या कार्यगौरवाचा सन्मान पावसे पाटील

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

संगमनेर प्रतिनिधी ( रोहीत पवार) : 

संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र  सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काम करत आहे सरपंच हा ग्रामीण विकासाचा शिल्पकार आहे . 

 सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे व्यक्तिमत्त्व आपल्या कार्याच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करून गावच्या ग्रामस्थांना व्यक्तिगत लाभाच्या योजनेचा फायदा करून देण्यासाठी अहोरात्र काम करत असतो गावात स्वच्छता अभियान अंतर्गत विविध विकासकामे स्मशानभूमी सुशोभीकरण वृक्षलागवड उपक्रम गावातील शाळा डीजीटल व गुणवत्ता पुर्ण मुलांच्या शैक्षणिक उपक्रमांत प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न असे अनेक उपक्रम योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सरपंच कटिबद्ध असताना उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सरपंचाचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सरपंच सेवा संघाच्या वतीने केला जातो यासाठी विविध प्रकारच्या निकषाप्रमाणे यांची निवड केली जाते सरपंच हा ग्रामीण भागाचा मुख्य आकर्षण आहे गाव अतर्गत रस्ते क्राॅक्रटीकरण तसेच पाणी टंचाई असो गारपीट असो कि गावातील विविध अडचणी असो वैद्यकीय अडचणी साठी सरपंच रात्रीबेरात्री मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्त्व  गावात पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू ठेवणे गांवाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे गावात प्रथमोपचार आरोग्य सुविधा उपलब्ध करणे सार्वजनिक जयंती धार्मिक सण उत्सव साजरा करणे  अशी जबाबदारी सांभाळताना आदर्श काम निर्माण करणाऱ्या आदर्श सरपंचाचा गौरव करण्याचा सरपंच सेवा संघा प्रयत्न आहे

Post a Comment

Previous Post Next Post