पाण्याच्या मोटारी चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक .3 लाख ,60 हजारांचा मुद्देमाल जप्त.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापुर :  कोल्हापूर जिल्हयातील करवीर तालुक्यात ग्रामीण भागातील म्हालसडे ,सडोली दुमाला ,घुगुरवाडी या गावातील शेतकरयांच्या नदी विहीरी वरिल पाण्याच्या मोटारीच्या चोरीचे प्रमाण वाढ़ले होते.त्या बाबतीत करवीर पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या होत्या.त्याचा तपास करीत असताना करवीर पोलिसांना काही जण चेरी रंगाच्या बोलेरो गाडीतुन पाण्याच्या मोटारी विक्री साठी म्हालसवडे ते भाटणवाडी या मार्गावर येणार असल्याचे समजले त्या नुसार पोलिसांनी सापळा लावला असता त्याना चेरी रंगाची बोलेरो गाडी येताना दिसली तिला थांबवण्याचा इशारा केला असता ती गाडी थांबली .

त्या गाडीत तपास करीत असताना सिटच्या खाली एक पोते दिसून आले त्या पोत्यात केबल वायर आणि मोटारी आढ़ळली त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी उडवा उडवीची उतरे दिली त्या सर्वांना पोलिसठाण्यात आणून त्याना विश्वावासात घेऊन चौकशी केली असता त्यानी म्हालसवडे ,घुगुरवाडी ,सडोली दुमाला आदी ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले असता त्या सर्वांना अटक करून त्यांच्या कडून 4 पाण्याच्या मोटारी ,दोन मोटार सायकलसह बोलेरो गाडी जप्त करण्यात आली.अटक केलेल्या मध्ये 1)राहुल अर्जुन पाटील 2)विनायक मारुती पाटील   3)राकेश पांडुरंग पाटील 4)सम्राट सर्जेराव पाटील 5)दिपक शिवाजी निकम 6)केशव लक्ष्मण पाटील.सर्व रहाणार म्हालसवडे. यांचा समावेश आहे.ही कारवाई करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे,सहाय्यक   पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे पोहेकॉ.विजय शिंदे,सुजय दावणे ,आणि त्यांच्या सहकार्यानी या कारवाईत भाग घेतला..

Post a Comment

Previous Post Next Post