प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा कोल्हापूर येथे

 वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  येथील आघाडीचे न्यूज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा दिनांक 29.05.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कोल्हापूर येथे श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे  या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 



 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा.आमदार श्रीमती जयश्री जाधव कोल्हापूर , कार्येक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रसाद कुलकर्णी, इचलकरंजी , हे आहेत , तर  कार्येक्रम प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक लोकसत्ताचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी मा.श्री. दयानंद लीपारे , ज्येष्ठ कवी श्री  पाटलोबा  पाटील , दैनिक ग्रामदेवता चे संपादक श्री.सखाराम जाधव हे आहेत. 

या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मा. श्री. एडवोकेट सय्यद नासिरुद्दिन हाशमी , ग्रामपंचायत सदस्य/ नायगाव , तालुका  अंबेजोगाई, जिल्हा बीड .तर या कार्यक्रमास विशेष सहकार  पुणे येथील लिमरा  एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. हाजी नाझीम शेख सर , इचलकरंजी येथील  जनसामान्यांचा प्रहारचे  संपादक विकास गायकवाड , कोल्हापूरचे माजी नगरसेवक श्री. ईश्वर परमार , व रायगड जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील पाटील या सर्वांचे  बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री मुरलीधर कांबळे ( पत्रकार ) हे आहेत

Post a Comment

Previous Post Next Post