महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवार, दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचे उद्घाटन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ,कुलपती डॉ पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एम.डी.लॉरेन्स,संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख,शाहिद इनामदार,एस.ए.इनामदार,असिफ शेख,अब्बास शेख,अफझल खान,मशकूर शेख,साबीर शेख,वाहिद बियाबानी यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले.
आझम कॅम्पसशी संलग्न संस्थांशी संबंधित पदाधिकारी,विश्वस्त देखील सहभागी झाले .साधू वासवानी चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आणि संदेशांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते.अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय होते.दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.