दिपक पुजारी यांना आदर्श विद्यार्थी गौरव पुरस्काराने सन्मानित

पुणे मध्ये राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवपुर्वक सन्मान करण्यात आले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

     दिपक भाऊसो पुजारी (शिरढोण)  या गावचे असुन डी.के.टी.ई. सोसासटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक, इचलकरंजी या कॉलेजमध्ये शिकत असुन टी.वाय. इलेक्ट्रॉनिक मध्ये 92.80% गुण मिळवुन कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच त्यांनी प्रथम वर्षांपासून ते आतापर्यंत प्रथम क्रमांक मिळविला आहे. 
त्यामुळे आधार सामाजिक सेवाभावी संस्था, जि - बेळगाव यांनी त्यांची दखल घेऊन राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल प्रेरणा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ . वाल्मिक वाघ, समर्थ फायनान्स व सरवय्या फायनान्स चे संस्थापक. पुणे तसेच प्रमुख मार्गदर्शक मा.प्रकाश कदम. प्रसिद्ध वक्ते लेखक कवी शिक्षक कोगनोळी, मा.मेजर मालिनी शर्मा  मुंबई,निर्वुत न्यायाधीश रविंद्र कुलकर्णी. पुणे, सौ.प्रिया वाघ. सरवय्या फायनान्स चे व्हाईस चेअरमन पुणे, डॉ.दिलिप नेवसे सावित्रीबाई फुले वंशज सातारा, मा.रॉकेश डोनवलेकर, उधोजक मुंबई, डॉ.ग्लोरी अरोकियन.भरतनाट्य डान्स टिचर. मुंबई,  मा. पुनम चौधरी.व्हि.जे.पाटील,प्रिन्सिपंल.खंडलगांव, आधार सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे, ॲड.एम.ए.सनदी निपाणी ॲड.प्रिती हट्टीमणी या सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल, कोल्हापूरी फेटा, शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व  5000 रु गौरव निधी देऊन आदर्श विद्यार्थी प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्यावर राज्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post