डॉ. चंदा निंबकर आणि मोनिका मोहिते यांना ‘स्त्री 2020’ आणि ‘शक्ति प्रेरणा’ पुरस्कार समांरभपूर्वक प्रदान



प्रेस मीडिया लाईव्ह :

  पुणे : समाजाच्या प्रगतीत भर टाकणार्‍या कोणत्याही कामाला कमी न लेखता काम करत राहणे सोपी गोष्ट नाही. मेंढपाळांसाठी व सेंद्रीय शेती विकसीत करण्यासाठी डॉ. चंदा निंबकर व मोनिका मोहिते यांचे कार्य उल्लेखनिय आहे.  त्यांच्या कामातून समाजाच्या प्रगतीला नक्कीच चालना मिळेल, असे प्रतिपादन विज्ञानभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे यांनी केले.


‘शक्ति’ या महिलांच्या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे ‘शक्ति’ स्थापना दिवस रविवारी स. प महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘शक्ति’ स्थापना दिनाचे औचित्य साधून फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. चंदा निंबकर यांना ‘स्त्री  2020 आणि शक्ति प्रेरणा’  या पुरस्काराने तर कोल्हापूरच्या सेंद्रीय शेती तज्ज्ञ मोनिका मोहिते यांना ‘शक्ति’ प्रेरणा पुरस्काराने विज्ञानभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे व ‘शक्ति’च्या  राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सुधा तिवारी यांच्या हस्ते  देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, मानपत्र व सत्कार  पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी ‘शारदा शक्ति’च्या अध्यक्षा डॉ. संगीता काळे,  राष्ट्रीय महासचिव डॉ. लिना बावडेकर, सचिव मनीषा कुलकर्णी आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना  यावेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.  मानसी बावस्कर या विद्यार्थीनीला ‘स्वशक्ती’ पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. भारत मातेच्या प्रतिमेची पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. डॉ. मृणाल वर्णेकर यांनी ‘शक्ति’ गीत सादर केले.

डॉ. शेखर मांडे म्हणाले, समाजाच्या प्रगतीत भर टाकणारे काम मोठे असते. त्यामुळे देशाच्या प्रगतीत भर टाकणार्‍या कामाला नेहमी प्रोत्साहन द्या. भारतात विज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे. कोविडच्या काळात भारतीय वैज्ञानिकांनी मोठी कामगिरी केली आहे. जगाच्या पातळीवर आपल्या आरोग्य तज्ज्ञांनी आपले ताकत दाखवून दिली आहे. त्याच प्रमाणे या दोन्ही पुरस्कार मिळविलेल्या तज्ज्ञ महिलांच्या कामाची प्रेरणा समाजाला मिळत राहील. त्याचबरोर देशाच्या प्रगतीतदेखील चालणा मिळले, असेही यावेळी डॉ. मांडे यांनी कौतूक केले.

डॉ. सुधा तिवारी म्हणाल्या, ‘शक्ति’ देशभर कार्यरत आहे. समाजाच्या प्रगतीसाठी काम करणार्‍या महिलांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात येतो. देशहितासाठी काम करणार्‍या महिला संस्था शोधून त्यांचे कार्य पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.पुरस्काराला उत्तर देताना डॉ. चंदा निंबकर म्हणाल्या, मला मिळालेला पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या टीमचा आहे. गेली 33 वर्षांपासून मेंढपाळ संशोधन क्षेत्रात काम करीत आहे. कर्तृत्वाचा गाजावाजा न करता काम करत आहे. दुर्लक्षित पशुपालन  व शेळ्यामेंढ्यासाठी सतत काम करीत आहे. विकासनशील देश पशुसंवर्धनाला महत्व देतो, त्याप्रमाणे आपल्या देशानेदेखील आणखी महत्व देण्यासाठी पुढकार घेतला पाहिजे. भारतात हजारो लोक मेंढपाळ करण्यासाठी फिरतीवर असतात. त्यांचे अर्थकारण या मेंढपाळीवर चालते. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करीत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

मोनिका मोहिते म्हणाल्या, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज शेतकरीदेखील आधुनिक पद्धतीने शेती करीत आहे.    विषमुक्त व (सेंद्रीय शेती) करुन समाजाचे आरोग्य जपण्यासाठी मी शेती व्यवसायात कार्यरत आहे.  ‘शक्ति’ संस्थेतर्फे मिळालेला हप पुरस्कार माझा आयुष्यतला पहिला आहे. पुरस्काराची सुरुवातच ‘शक्ति’पासून झाली आहे. यापुढे यश संपादन करण्यासाठी सतत ‘शक्ति’ची प्रेरणा मिळत राहील, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

डॉ. संगीता काळे यांनी संस्थेच्या कार्यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या,  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे हे ‘शक्ति’चे उद्दिष्ट आहे. महिला बचतगट, शालेय व विद्यालयीन कष्टकरी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाते. मनिषा कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. प्रज्ञा देशपांडे यांनी मोनिका मोहिते व डॉ. चंदा निंबकर यांच्या मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंदना कुलकर्णी व अर्पणा खांडेकर यांनी केले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.






Post a Comment

Previous Post Next Post