आगामी महानगरपालिका निवडणूक तितकी सोपी राहणार नाही..

भाजपच्या इच्छुक नगरसेवकांना आगामी महानगरपालिका निवडणूक तितकी सोपी राहणार नाही..


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महानगरपालिकेत पाच वर्षे एकहाती सत्ता आणि खासदार, पाच आमदार, असा मोठा फौजफाटा असताना देखील त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव होणे हा सर्वाँना विचार  करण्यास भाग पाडले आहे . शिवाय अती आत्मविश्वास नडला हे ही तितकेच सत्य आहे  , भाजपच्या इच्छुक नगरसेवकांना आगामी महानगरपालिका निवडणूक तितकी सोपी राहणार नसल्याचे स्पष्ट झालेय. यामुळे भाजपला या ठिकाणी नवीन रणनिती तयार करावी लागणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील , निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, धीरज घाटे यांच्यासह माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. मात्र,तरीही शहर भाजपला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर पक्षसंघटनेची बांधणीही किती कमकुवत आहे आणि स्थानिक पदाधिकारी, नेत्यांची जनतेशी नाळ कशी तुटलेली आहे, हेही या निवडणुकीने अधोरेखित केले.

कसबा विधानसभा मतदारसंघात १८ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवक भाजपचे आहेत. पालिकेतील पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात कसबा पेठ मतदारसंघाला अडीच वर्षे महापौरपद, तीन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि तब्बल दोन वेळा सभागृह नेतेपद आणि १२ नगरसेवक असताना बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपचा पराभव झाला. त्यामुळे शहर भाजपमध्ये उलथापालथ होणार आहे. आता कसब्यातील भाजपच्या या सोळा नगरसेवकांचे भवितव्यही पणाला लागले आहे.

भाजपला 'ती' चूक भोवली....

कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने भाजप विरोधात कसब्यात नाराजीचा सूर उमटला होता. भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न देता भाजपच्या हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post