मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याला घवघवीत यश

 अर्थमंत्र्यांकडून पत्रकार कल्याण निधीत 50 कोटीची वाढ


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई- मराठी पत्रकार परिषदेने केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार  स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीत आणखी ५० कोटींची वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतांना केली आहे.. त्यामुळे ठेवीतील रक्कम आता १०० कोटी झाली आहे.. 

या ठेवीच्या व्याजातून पत्रकार आरोग्य योजना आणि पत्रकार सन्मान योजना चालविल्या जातात..ठेवीतील रक्कम वाढविल्यामुळे पत्रकार सन्मान योजनेचा लाभ आता अधिकाधिक जेष्ठ पत्रकारांना मिळेल अशी अपेक्षा मराठी पत्रकार परिषदेने व्यक्त केली असून अधिक ५० कोटींच्या घोषणेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने धन्यवाद दिले आहेत..


 Post a Comment

Previous Post Next Post