कौटुंबिक वादातून विवाहितेने तिच्या दीड वर्षाच्या बालकासह रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर: कौटुंबिक वादातून विवाहितेने तिच्या दीड वर्षाच्या बालकासह रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.

रुकसार अनिस निशाणदार (वय २६) आणि उमर अनिस निशाणदार (वय दीड वर्षे दोघेही मूळ रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, सध्या रा. रंकाळा टॉवर परिसर, कोल्हापूर) असे मृतांचे नाव आहे. सोमवारी (१३) दुपारी ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री साडेआठच्या सुमारास दोघांचे मृतदेह रंकाळ्यातून बाहेर काढले. पती अनिस अन्वर निशाणदार आणि सासू सायराबानू अन्वर निशाणदार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतली. तर सासरचे काही नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यासाठी सीपीआरमध्ये आल्याने दोन्ही गटात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post