टाकी पासिंग बीटी फॉर्म शुल्क रद्दवर शिक्कामोर्तब; 'आप' रिक्षाचालक संघटनेकडून साखर वाटून जल्लोष

रिक्षाचालकांचे साडेसातशे रुपये वाचणार

आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या पाठपुराव्याला यश


प्रेस मीडिया लाईव्ह :

एखाद्या रिक्षाचे इंजिन, चासीस किंवा टाकी बदलली असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयात बीटी फॉर्म भरून घेतला जाण्याची तरतूद आहे. परंतु प्रत्येक टाकीच्या पासिंगवेळी हा नियम लागू करून साडेसातशे रुपये भरून घेतले जात असल्याचे आम आदमी रिक्षाचालक संघटनेने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. 

यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहन काटकर यांच्या उपस्थितीत आरटीओ येथील बैठकीत आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई यांनी अनावश्यक बीटी फॉर्म रद्द करण्याची कार्यवाही कधीपर्यंत करणार अशी विचारणा केली होती. यावर पाटील यांनी एका आठवड्यात याबाबत अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिलेले. 



यावर टाकी पासिंगसाठी येणाऱ्या रिक्षाचालकांकडून बीटी फॉर्म शुल्क आकारण्यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी परिवहन विभागाकडून मार्गदर्शन मागवले होते. यावर सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी जुने सिलेंडर बदलून नवीन सिलेंडर बसवल्यास बीटी लागू होईल, अन्यथा होणार नाही असे मत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कळवल्याने जाचक बी टी शुल्क रद्द वर अखेर शिक्कामोर्तब झाला.

हा निर्णय समजताच 'आप' रिक्षाचालक संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना साखरवाटप करून जल्लोष करण्यार आला. या निर्णयामुळे रिक्षाचालकांचे साडेसातशे रुपये वाचणार असून संघटनेच्या पाठपुराव्याला यश आल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश गायकवाड यांनी सांगितले. बी टी शुल्काचा भुर्दंड बंद होऊन प्रत्येकी साडेसातशे रुपये वाचणार असल्याने रिक्षाचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी बाबुराव बाजारी, मंगेश मोहिते, संजय नलावडे, प्रकाश हरणे, विजय भोसले, शकील मोमीन, प्रभाकर चौगुले, अमरसिंह दळवी, आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post