प्रेस क्लबच्या वतीने महिला पत्रकारांचा सत्कारप्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकारितेतील विविध आघाड्यांवर काम करणार्‍या महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ महिला पत्रकार, संपादिका सुनंदा मोरे यांच्या हस्ते सर्व महिला पत्रकारांना फेटा, गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात 10 वर्षांचा अनुभव असणार्‍या महिला पत्रकारांच्या अनुभवावर आधारीत पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याची घोषणा प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केली.

यावेळी विविध दैनिकातील महिला पत्रकार, वृत्त निवेदिका, याचबरोबर विविध पातळ्‌यांवर मोठ योगदान देणार्‍या सर्वच महिला पत्रकारांचा कोल्हापूरी फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महिला पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावून सर्वांशी मनमोंकळा संवाद साधला.

याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना सुनंदा मोरे म्हणाल्या, पूर्वीच्या काळी पत्रकारितेसारख्या क्षेत्रात महिला फारशा नसायच्या. जरी असल्या तरी सांस्कृतिक विभागापुरत्याच मर्यादित असायच्या. पण सध्याच्या युगात हे चित्र बदलेलं आहे. त्याकाळी काही महिलांनी घातली गेलेली ही पाउलवाट आज अनेक नवया महिला पत्रकारांना मार्गदर्शक झाली आहे. म्हणूनच पत्रकारितेच्या विविध आघाड्यांवर काम करणार्‍या महिला पत्रकारांनी एकत्र येवून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वागत प्रस्ताविक प्रेस क्लब चे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी केले. महिला पत्रकारांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कार्याध्यक्ष दिलीप भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार सचिव बाबासाहेब खाडे यांनी मानले. याप्रसंगी प्रेस क्लबचे संचालक समीर मुजावर, नंदिनी नरेवाडी, अश्विनी टेंबे, भूषण पाटील, सचिन सावंत, भारत चव्हाण यांच्यासह सर्व सत्कारमूर्ती महिला पत्रकार उपस्थित होत्या.


Post a Comment

Previous Post Next Post