कै. आमदार चंद्रकांत जाधव स्मृति चषक आज पासून सुरू...



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर  कै. आमदार चंद्रकांत जाधव स्मृति चषक टी -20 क्रिकेट स्पर्धा शांद फौंडेशन आणि परिवहन कल्चरल स्पोर्टस्च्या वतीने आमदार जयश्री जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर ग्रांऊड आणि शिवाजी विद्यापीठ  ग्रांऊड वर 29 मार्च ते 2एप्रिल या दरम्यान  या स्पर्धा  होणार आहेत. या स्पर्धेत कोल्हापूरसह अन्य जिल्हयातिल आठ संघ भाग घेणार आहेत.     विजयी संघास 50 हजार आणि चषक ,उपविजेत्या संघास 25 हजार आणि चषक मिळणार आहे. यांच्याबरोबरच  सामनावीर ,उत्कृष्ट फंलदाज ,बॉलर ,मालीकावीर यांनाही बक्षीसे मिळणार आहेत.या स्पर्धेचे उदघाटन आ.जयश्री जाधव व आ.जयवंत आसगावकर यांच्या उपस्थितीतआणि बक्षीस समारंभ ता. 2 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता आ .सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.       तरी क्रिकेटप्रेमीनी याचा लाभ घेण्याचंआवाहन उद्योजक सत्यजीत जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post