प्रेस मीडिया लाईव्ह :
खोतवाडी प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जागा खरेदी भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशीच्या मागणीसाठी खोतवाडी ग्रामपंचायत समोर आज सकाळपासून अमरण उपोषणास माजी ग्रामपंचायत सदस्य अजित सोळशे यांनी प्रारंभ केला .
या उपोषण आंदोलन स्थळी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले, अभिजित पटवा इनाम , अंजना शिंदे प स सदस्य हातकणंगले , आनंदा शेट्टी तालूका प्रमख शिवसेना (ठाकरे ) माजी सरपंच आभन सुतार , विनायक शेटके आदीच्या सह 223 नागरीकांनी उपस्थित राहून आंदोलनास जाहीर पाठिंबा व्यक्त केला
दरम्यान गटविकास अधिकारी डॉ . शबाना मोकाशी यांचे उपोषणा पासून परावृत्त करण्याबात पोलिस निरक्षक शहापूर पोलिस ठाण्याकडे व सरपंच खोतवाडी यांच्या कडे लेखी पत्र दिले आहे. यासंदर्भात खोतवाडीचे विट्मान सरपंच विशाल कुंभार यांनी रात्री 9.00 वाजता उपोषणकर्ते अजित सोळसे यांना उपोषण स्थळी भेटून उपोषणापासून परावृत होण्यासंदर्भात विनंती केली
ग्रामपंचायत खोतवाडी तालुका हातकणंगले येथील तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी दि.२४/११/२०२२. रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधण्याकरिता गावातीलच अमर शिवाजी गोसावी यांच्या मालकीचे गट नं १५ एकूण क्षेत्र हे ०.९३.०० आर प्लॉट नं ३० चे क्षेत्र १३९.४० चौ.मी म्हणजेच क्षेत्र १५०० चौ. फूट ची बिगरशेती खुली जागा १५ लाख रु. ने खरेदी केली आहे. खरेदीची हि रक्कम बाजारभावानुसार नसून वाढीव किंमतीने दाखवून लाखो रु. चा भ्रष्टाचार केला आहे. याचे उदाहरण म्हणजेच गावातील त्याच गट नं १५ मधील अमर गोसावी यांच्याच मालकीची क्षेत्र १८०० चौ फुट चा भूखंड शाबुद्दीन मणेर यांनी ७ लाख १५ हजार रु ला दि १३/०४/२०२२ रोजी खरेदी घेतली आहे. दोन्ही जागेच्या खरेदीचे दस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनाला दिलेल्या अर्जासोबत अजित सोळशे यांनी जोडले आहे. एकाच गट नं मधील एकाच मालकाची जमिन असताना १८०० चौ फूट हि जागा ७ लाख १५ हजार ला खरेदी होते तर दुसरी जागा ग्रामपंचायत ने घेतलेली १५०० चौ.फूट हि जागा १५ लाख रु ने खरेदी होते यामध्ये अंदाजे ८ लाख ७५ हजार रु वाढीव किंमतीने खरेदी केली आहे. यामध्ये शासनाची दिशाभूल करून सरळ सरळ ग्रामपंचायतीने आर्थिक गैर व्यवहारआहे करून भ्रष्टाचार केला आहे. तरी साम्भंधित ग्रामसेवक श्री अनंत गडदे व तात्कालीन सरपंच संजय चोपडे यांच्यावर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा व वाढीव किंमतीचा फरक वसूल करण्यात यावा या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य अजित सोळसे हे लोकशाही मार्गाने सोमवार दि २०/०३/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करित आहेत