क्राईम न्यूज : कोंढवा पोलिसांनी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद

या गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे हे करीत आहेत.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कोंढवा पोलिसांनी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला  केले जेरबंद  आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द या पुर्वी वानवडी पोलिस ठाणे येथे मोटार सायकल चोरी ३, माराहाणीचा ०१ गुन्हा दाखल आहे. या बाबतचा अधिक पोलिस  तपास करत आहेत.

दिनांक १२/०२/२०२३ रोजी दुपारी ०१:३० वा.चे दरम्यान टेबल पॉईन्ट, बोपदेव घाट येथे फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्याला अडवुन पुरुषाच्या गळयातील १ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून नेल्याबाबत कोंढवा पोलिस ठाणे पुणे येथे गुरन. १७० / २०२३ भादवि कलम ३९२, ३४१, ३२३, ३४ प्रमाणे जुबेर अलाउद्दीन खान (वय २४ वर्षे, धंदा- फर्निचर, रा.लेन नं. ०६, अलिफ टॉवरचे जवळ, अश्राफनगर, कोंढवा, खुर्द पुणे) यांनी गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपी याचा शोध घेण्याबाबत कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे व संजय मोगले पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांनी आदेशीत केले होते. 

आरोपी यांचा सीसीटीव्ही तसेच गुप्त बातमीदारा मार्फतीने तपास पथक अधिकारी अनिल सुरवसे, पो.हवा.२८३ अमोल हिरवे, पो हवा ३७६८ महेश वाघमारे, पो शि १०११४ सुहास मोरे, पो.शि.८४४२ गणेश चिंचकर, पो शि ९१२६ विकास मरगळे, पो शि ८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो शि १००७५ राहुल रासगे, पो शि ८६४६ जयदेव भोसले, पो शि १००२६ राहूल थोरात असे शोध घेत होते. आरोपीचा शोध घेत असताना बोपदव घाट पासून ते सय्यदनगर हडपसर पुणे दरम्यान बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही पाहणी पोलिस अंमलदार सुहास मोरे, राहूल थोरात यांनी केली होती, त्यांना नमुद गुन्हा हा सय्यदनगर भागात राहणारा शाहरुख उर्फ सुस्ताड अन्सारी यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी याला पकडण्याकामी सय्यदनगर हडपसर भागात जावून शोध घेत असताना तो उंड्री भागात पांढ-या रंगाच्या अॅसिक्स मोटार सायकल वरुन त्याच्या मित्रा सोबत गेला असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी याचा सय्यदनगर ते मोहम्मदवाडी असा शोध घेत असताना आरोपी शाहरुख उर्फ सुस्ताड शकिल अन्सारी/मन्सुरी हा कडनगर चौकात पांढ-या रंगाच्या ॲसिक्स मोटार सायकल क्रं.एम.एच.१२ यु.वाय.०६३२ हीच्या वरुन त्याच्या मित्राच्या सह मोहम्मदवाडीच्या दिशेने जाताना दिसले. त्याच्या पाठीमागे जावून त्यास गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता त्यास पोलिस असल्याचा संशय आल्याने तो गाडी पळवू लागला. 

पोलिसांनी थोडयाच अंतरावर पाठलाग करुन अडवून बाजुला घेतले. शाहरुख उर्फ सुस्ताड शकिल अन्सारी/मन्सुरी (वय २० वर्षे, रा. ग.न.२९-ए), हा अश्रमान खान यांच्याकडे भाडयाने, सय्यदनगर, हडपसर पुणे असे व त्याच्या पाठीमागे विधीसंघर्षग्रस्त बालक बसल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

सदर आरोपी यास अटक करुन त्याच्याकडे तपास केला असता त्यांने डिसेबर महिन्यात गोकुळ हॉटेल जवळ पायी चालत जाणा-या महिल्याच्या गळयातील मंगळसुत्राचे पेंन्डड त्याचा दुसरा साथीदार नुर याच्यासह चोरी केल्याचे कबुली दिली. वरील दोन्ही गुन्हयात चोरी करुन लपवून ठेवलेली सोन्याची चैन व मंगळसुत्राचे पेंन्डड व गुन्हा करण्यासाठी वापरलेली अॅसिक्स मोटार सायकल क्रं.एम.एच.१२ यु.वाय.०६३२ ही जप्त करण्यात आली आहे. आरोपी यांने कोंढवा पोलिस ठाणे पुणे गुरन. १७० / २०२३ भादवि कलम.३९२,३४१,३२३,३४ व कोंढवा पोलिस ठाणे पुणे येथे गुरन.११९३/२०२२, भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे २ चैन स्नॅचिंग गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द यापुर्वी वानवडी पोलिस ठाणे येथे मोटार सायकल चोरी ३ माराहाणीचा ०१ गुन्हा दाखल आहे. या गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post