पिंपरी व कसबा या दोन्ही मतदार संघात भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून जिंकण्यासाठी कंबर कसलीप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  पिंपरी व  कसबा या दोन्ही मतदार संघात भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून जिंकण्यासाठी  कंबर कसली आहे ,  त्यात कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे  सर्वांचे लक्ष लागलेले  आहे. कसब्याची निवडणूक ही दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.  कसब्यात भाजपकडून जोरदार तयारी सुरु केली  आहे. प्रचारासाठी फक्त काही तास बाकी आहेत. त्यामुळे भाजपने भाजपच्या तीन मुख्य़ नेत्यांकडे कसब्याची शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. 

चिंचवड मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र दुसरीकडे कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केल्याने भाजपला घाम फुटला आहे कसबा मतदारसंघाची जबाबदारी गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर या भाजपच्या प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पक्षाची आणि वैयक्तिक सगळी कामं बाजूला ठेवून त्यांनी कसबा मतदार संघाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश या तीन नेत्यांना दिले आहेत.

कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे. त्यामुळे धंगेकरांच्या प्रत्येक हालचालीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्य़ातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी काहीच तास बाकी असताना भाजपकडून जोमात प्रचार सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post