सस्टेनेबिलिटी इन हाय राईझ' विषयावरील ग्रीन कॉन्क्लेव्हला चांगला प्रतिसाद

इमारतींची वाढती उंची आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन

कार्बन न्यूट्रल शहरांसाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्न व्हावेत : प्रशांत गिरबाने

सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ' कडून आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स 'च्या वतीने 'सस्टेनेबिलिटी इन हाय राईझ' विषयावर  ग्रीन कॉन्क्लेव्ह चे आयोजन करण्यात आले होते. सुझलॉन वन अर्थ (केशवनगर , हडपसर) येथे ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात ही कॉन्क्लेव्ह झाली. 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'चे महासंचालक प्रशांत गिरबाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुण्यात ३० मजली,५५ मजली उंच इमारतींची बांधकामे चर्चेत आहेत.  आहे.निवासी इमारती,व्यावसायिक इमारती किंवा दोन्हीही असलेल्या इमारती स्मार्ट सिटी आणि इतर भागात आकाराला येणार आहेत. पुण्याची क्षितिजे उंचावणाऱ्या या इमारतींच्या बांधकामामुळे शाश्वत विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली . आर्किटेक्ट,सल्लागार,अभियंते ,नागरिक प्रतिनिधी असे ३०० जण या परिषदेत सहभागी होते. या एक दिवसीय कॉन्क्लेव्ह मध्ये पंकज धारकर,एन एस चंद्रशेखर,आनंद चोरडिया,चेतन सिंग सोळंकी हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ केरी चॅन,केन यिंग,डॉ हरिहरन,मिली मुजुमदार,अनुजा सावंत,अरविंद सुरंगे यांनी मार्गदर्शन केले. सानिका पागे यांनी सूत्रसंचालन केले. 'सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स 'च्या पुणे चॅप्टर चे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे,कॉन्क्लेव्ह च्या निमंत्रक, अंशुल गुजराथी, कर्नल सुनील नरूला यांनी स्वागत केले. 

यावेळी अरविंद सुरंगे,अमोल उंबरजे, सुभाष खनाडे,विशाल पवार, उल्हास वटपाल, अभिजीत पवार, केतन चौधरी दीपक वाणी, नंदकिशोर मातोडे, अरुण चिंचोरे, रितेश खेरा, सुजल शाह, सिध्दांत जैन,आशुतोष जोशी,अमित गुळवडे,नंदकिशोर कोतकर,विमल चावडा,चेतन ठाकूर,सिम्पल जैन, देविका मुथा, सानिका इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

कार्बन न्यूट्रल शहरांसाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्न व्हावेत : प्रशांत गिरबान.

प्रशांत गिरबाने म्हणाले, 'कार्बन न्यूट्रल पुण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. त्यासाठी सक्ती करण्याची वेळ येता कामा नये.जागृती घडवून स्वयंप्रेरणेने हे काम झाले पाहिजे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज योगदान देईल.

एन.एस. चंद्रशेखर म्हणाले, 'लोकसंखा, शहरांप्रमाणे रिएल इस्टेट मार्केट वाढत आहे. ३० टक्के जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा आहे. कार्बन उत्सर्जन देखील वाढत आहे. वीजेचा वापर कमी केला पाहिजे.आपल्या इमारती मुळे परिसंस्थेवर परिणाम होऊ देता कामा नये. आम्ही आमच्या सदस्यांना उर्जा वापरात स्वावलंबी होण्याचा आग्रह धरत आहोत. पुढील पिढयांना चांगल्या गोष्टी , पर्यावरणपूरक विकास दिला पाहिजे.पृथ्वी -पर्यावरण - परिवर्तन ही शाश्वत विकासाची त्रिसूत्री ठरली पाहिजे.

डिकार्बनायझेशन बद्दल बोलताना मिली मुजुमदार म्हणाल्या, ' भारत हा कार्बन उत्सर्जनाबाबत जगात तिसऱ्या कमांकावर आहे. ५७ टक्के उत्सर्जन वीज वापर, उष्णता यामुळे होते. २४ टक्के उत्सर्जन इंधन जाळल्याने तर १८ टक्के बांधकामात सिमेंट -लोखंड वापरल्याने होते. त्यावर पर्यावरणस्नेही उपाययोजना केल्या पाहिजेत.   बांधकाम साहित्य, वातानुकूलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जमेल तिथे पुनर्वापर या मुद्दयांचा विचार केला पाहिजे.

एसिया पॅसिफिक ग्रीन बिल्डींग कौन्सिल चे अध्यक्ष कॅरी चॅन यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

इमारतींची वाढती उंची आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन

 'डी कार्बनायझेशन ,एयर क्वालिटी,हेल्थ,प्रॉडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी' ,स्टेकहोल्डर्स इंटरव्हेन्शन फॉर हाय राईज',इश्युज अँड रिझॉल्युशन्स -सर्व्हिसेस इन हाय राईज','पावरिंग सस्टेनेबल इंडिया विथ ग्रीन फायनान्स' अशा विषयावर चर्चासत्रे या परिषदेत आयोजित करण्यात आली होती. 

मान्यवरांचा गौरव :

आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा यावेळी विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात  आला.  आनंद चोरडिया(अर्थ अवॉर्ड),सुभाष देशपांडे(वॉटर अवॉर्ड),पंकज धारकर(फायर अवॉर्ड),एन एस चंद्रशेखर(विंड अवॉर्ड),विश्वास कुलकर्णी(स्पेस अवॉर्ड),प्रदीप भार्गव (इलेमंट ऑफ सस्टेनेबिलिटी अवॉर्ड),चेतन सोळंकी(एलेमेंट ऑफ एनर्जी),शीतल भिलकर(वूमन आयकॉन अवॉर्ड) यांचा त्यात समावेश आहे.ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात  आले. 

फॅब्रिक सॉक्स,विप्रो,ग्राउंड ११ आर्किटेक्टस,असाही इंडिया ग्लास लि.,७५ एफ, गेब्रिट,चतुर प्रेमानंद वासवानी,प्रोलिट ऑटोग्लो यांच्या सहकार्याने ही कॉन्क्लेव्ह पार पडली. आर्किटेक्ट,इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन, एफ एस ए आय,जीबीसी आय,इन्फ्रा,ऑसम,इसले,सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज या संस्थांनी संयोजनात सहकार्य केले. Post a Comment

Previous Post Next Post