जुन्या वाड्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य रवींद्र धंगेकरांचा जाहीरनामा प्रकाशित

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाचा संपूर्ण कायापालट करणारे  कसब्याचा सेवापर्व सुरु होत असल्याचे जाणीव करून देणारा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा जाहीरनामा आज कॉंग्रेस भवन येथे प्रकाशित करण्यात आला. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या या मतदारसंघात दीर्घकाळ तुंबलेले प्रश्न अधिक बिकट झाले आहेत व त्यामुळेच ते तातडीने सोडविण्याची नितांत गरज आहे. हे लक्षात घेऊन जुन्या वाड्यांचा प्रश्न योग्य कायद्यांच्या आधारे व सर्वांना मान्य होईल अशा प्रकारे सोडवण्याच्या संदर्भात भर देण्यात येणार आहे.

 





मुठा नदी ही पुण्याचे भूषण सध्या या नदीची अवस्था अत्यंत वाईट आहे. या परिसरातील डासांचा उपद्रव संपविणे व सुशोभीकरण याची अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन शनिवारवाडा व नदीकाठ रहिवासी सुधार योजना प्रकल्प राबविणे यावर भर देण्यात येणार आहे.

 

कसब्यातील जुन्या जलवाहिन्या वगळून अधिक व्यासाच्या नव्या जलवाहिन्या टाकणे व सुरळीत समान दाबाने २४*७ पाणीपुरवठा करणे तसेच पाण्याची गळती थांबविणे हा देखील प्राधान्याने सोडविण्याचा प्रश्न असणार आहे.

 

शहराच्या मध्यवस्तीत असल्यामुळे येथे गेली ३० वर्षात मोठे रस्ता रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे वाहतूककोंडीला सर्वांनाच रोज तोंड द्यावे लागते. तसेच पार्किंगचाही प्रश्न खूप मोठा आहे या प्रश्नाकडेही लक्ष वेधले आहे.

 

रोजगार, शिक्षण , कचराकुंडी मुक्त कसबा करणे, सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या प्रतीची वैद्यकीय सेवा देणे, महिला सबलीकरण अशा मुख्य समस्यांच्या सोडवणुकीवर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.

 

या जाहीरनाम्याच्या पूर्ततेसाठी ‘कसबा विकास परिषद’ आयोजित करून पुढील ५ वर्षांचा विकासाचा ब्ल्यू प्रिंट तयार करणार असून माझ्या कारकीर्दीच्या आगामी दीड वर्षात कोणती कामे प्राधान्याने करायची या संदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक यांच्या सहकार्याने विकासाचा ब्ल्यू प्रिंट बनवणार असे धंगेकर यांनी सांगितले.

 

Post a Comment

Previous Post Next Post