पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्यांना मा.उप सभापतींकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथप्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई  : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3)(ख) अन्वये, महाराष्ट्र विधानपरिषदेवर पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्य श्री.सत्यजीत सुधीर तांबे, नाशिक विभाग पदवीधर व श्री.धीरज रामभाऊ लिंगाडे, अमरावती विभाग पदवीधर तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3)(ग) अन्वये, महाराष्ट्र विधानपरिषदेवर शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्य श्री.विक्रम वसंतराव काळे, औरंगाबाद विभाग शिक्षक, श्री.सुधाकर गोविंदराव अडबाले, नागपूर विभाग शिक्षक व श्री.ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, कोकण विभाग शिक्षक अशा एकूण पाच मा.सदस्यांनी आज दिनांक 08 फेब्रुवारी, 2023 रोजी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मा.उप सभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांचेकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. 

विधान भवन, मुंबई येथे झालेल्या या शपथविधी समारंभाच्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे मा.विरोधी पक्ष नेते श्री.अजित पवार, महाराष्ट्र विधानसभा सदस्य श्री.अशोक चव्हाण, श्री.जयंत पाटील, श्री.अमिन पटेल, श्री.बालाजी किणीकर, श्री.अनिल पाटील, श्री.किशोर जोरगेवार, महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य श्री.अभिजीत वंजारी, विधानसभा माजी सदस्य श्री.विजय गव्हाणे तसेच विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, निर्वाचित सन्माननीय सदस्यांचे स्नेही, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post