तिसऱ्या मुलानंतरही उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र..प्रेस मीडिया लाईव्ह 

मुंबई : महाराष्ट्र व्हिलेज पंचायत अॅक्टच्या संदर्भात  बाॅबे हायकोर्टाने आपला निकाल दिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कट ऑफ डेटनंतर जन्माला आलेलं मुलं किंवा नॉमिनेशन दाखल करण्यापूर्वी तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला तर त्या उमेदवारांच्या पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही. असा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतो, त्याच्या उमेदवारीवर कोणताही व्यक्ती प्रश्न उपस्थित करू शकत नाही. 

न्यायमूर्ती आर पेडणेकर यांनी प्रशासनाने दिलेला निर्णय बरखास्त केला. ज्यामध्ये एका महिलेला तीन अपत्येंमुळे डिस्क्वालिफाय केले होते. प्रशासनाचे म्हणण होते. कट ऑफ डेटनंतर महिलेने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. बाॅबे हाईकोर्टने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मुलं जन्माला आले होते. पण नामांकन भरण्याच्या तारखेपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे.

सेक्शन 14(1)(j-i) सांगते की कोणत्याही व्यक्तीला दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्यास निवडणूक लढता येणार नाही. या खटल्यामध्ये याचिकाकर्ता महिला जानेवरी 2021 च्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. पण गावातील एका सदस्याने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने महिलेची निवड रद्द केली. तक्रारदाराचे म्हणणे होते की, कट ऑफ डेट 9 सप्टेंबर 2001 होती. महिलेला जो तिसरे मुलं झाले. ते या तारखेनंतर जन्माला आल्याने ती निवडणूक लढविण्यास पात्र नाही. याचिकाकर्ता महिलेचे वकिल म्हणाले की, तिसऱ्या मुलाचा जन्म 12 फेब्रुवारी 2002 ला झाला होता. पण मॅच्युर नसल्याने 2 एप्रिल 2002 ला त्याचा मृत्यू झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post