अज्ञातांनी शाळेतील आवार भिंत पाडली

 ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा दुर्लक्ष


प्रेस मीडिया लाईव्ह :

 राहुल सोनोने : (मळसुर)

 जिल्हा परिषद शाळेतील आवार भिंत व पायऱ्याची भिंत अज्ञातांनी पाडली. या शाळेमध्ये काही गावगुंड रात्री दारू पिऊन झोपतात. आवारात दारूच्या बाटल्या फोडत असल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्हा परिषद शाळेमध्ये काही गावगुंड शौचास बसतात. तसेच जागोजागी घाण करीत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. या अगोदर शाळेतील मुख्याध्यापकांनी चान्नी पोलिस स्टेशनला वारंवार तक्रार दिली. मात्र, काहीच उपयोग होत नाही. चान्नी पोलिसांनी रात्रीच्या वेळी

शाळेमध्ये फेरफटका मारावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. या अगोदर शाळेतील साहित्य चोरी गेले होते. शाळेतील फरशी सुद्धा फोडण्यात आली असून, गावगुंडांची मुजोरी वाढली आहेत. तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन गावगुंडांवर कारवाई करावी, अशी मागणी मळसूर ग्रामस्थ करीत

Post a Comment

Previous Post Next Post