इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादनप्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

        इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंती निमित्त इचलकरंजीत महानगरपालिकेच्या वतीने शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास  प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय मा. विकास खारगेसो  यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाशराव आवाडे व आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  तसेच छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्ध पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. याचबरोबर छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

      


तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने  १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य गीत म्हणून अंगिकारणेत आलेल्या महाराष्ट्र राज्यगीत ( गर्जा महाराष्ट्र माझा) गायण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला*

         याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, रविंद्र माने, रवी रजपुते, शिवतीर्थ समिती अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, नितिन जांभळे,मनोज साळुंखे,किसन शिंदे, उपायुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता संजय बागडे, सुभाष देशपांडे, नगर रचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, क्रीडा अधिकारी शंकर पोवार, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील यांचेसह मोठ्या प्रमाणात शहरवासीयांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post