समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ठीकणे व लिपारे यांचा सत्कार

    प्रेस मीडिया लाईव्ह :

   इचलकरंजी ता.११ ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठीकणे यांना महाराष्ट्र   पत्रकार संघाचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार त्याचबरोबर श्रमिक पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांना कोल्हापूर प्रेस क्लबचा मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोन्हीही आदर्श पत्रकारांचा समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. 

ज्येष्ठ पत्रकार डी.एस. डोणे आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.तसेच रामभाऊ ठीकणे आणि दयानंद लिपारे यांच्या पत्रकारितेतील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यात आला आणि त्यांच्या उत्तम वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांच्या ' प्रसार माध्यमे, पर्यायी माध्यमे आणि लोकशाही' या लेखावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत तुकाराम  अपराध, महालिंग कोळेकर ,नारायण लोटके, शकील मुल्ला ,सचिन पाटोळे, आनंदराव नागावकर ,अशोक मगदूम, मनोहर जोशी, गजानन आंबी,संजय बागडे ,आनंद जाधव आदिनी सहभाग घेतला...

Post a Comment

Previous Post Next Post