उरण पनवेल रस्त्याच्या कडेला कोल्हा मयत झालेला आढळला


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनिल पाटील :

उरण पनवेल रस्त्याच्या कडेला रविवारी एक कोल्हा मयत झालेला आढळला आहे. कोल्ह्याचा मृत्यू संशयीत असल्याचे बोलले जात आहे. उरण परिसरतातील वन्यजीव धोक्यात आले आहेत.उरण हे सध्या औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने विकसित होत असलेला तालुका आहे. त्यामुळे येथील जंगल परिसराचा मोठया प्रमाणात विध्वंस केला जात आहे. यामध्ये जंगलांची तोड केली जात आहे. तसेच डोंगर ही पोखरले जात आहेत.

त्यामुळे निसर्ग ही नष्ट होऊ लागली आहेत.उरणच्या पश्चिम विभागात खाडी किनाऱ्यावर कांदळवनात कोल्हे आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन कोल्हे दिसून आले होते. ही कोल्ह्याची प्रजाती लुप्त होऊ लागली आहे. तर काही दिवसांपूर्वी चिरनेर च्या जंगलात मोर आणि डुक्कर यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे उरण मधील वन्यजीव धोक्यात आले आहेत.
Post a Comment

Previous Post Next Post