दामा, मामा, काका अशा फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या तब्बल तीन हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली

 या वाहनांच्या नंबरप्लेट जागेवरच काढून घेत त्यांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला


प्रेस मीडिया लाईव्ह :

मो. सादिक मजाहिरी

पुणे- शहरातील वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखा सरसावली असून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. फटफट करणाऱ्या सायलेंन्सरवर कारवाईची मोहीम संपल्यानंतर आता फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई करण्यात येत आहे. मागील तीन आठवड्यात दामा, मामा, काका अशा फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या तब्बल तीन हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांच्या नंबरप्लेट जागेवरच काढून घेत त्यांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या दोन्ही कारवाया सुरूच रहाणार असल्याचे वाहतूक उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

शहरात बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांवर सीसीटीव्हीव्दारे कारवाई करताना अडथळे निर्माण होतात. नंबरप्लेटवरील नंबर व्यवस्थीत न दिसल्याने अनेकदा दंड दुसऱ्याच वाहनचालकाला जातो. तर काही नंबरप्लेट इतक्‍या लहान अक्षरात लिहिलेल्या असतात, की त्या सीसीटीव्हीमध्येही दिसत नाहीत. यामुळे नियमभंग करणाऱ्यावर कारवाई करता येत नाहीत तसेच गुन्हेगारांच्या वाहनांना अशी नंबरप्लेट असेल तर त्याचा माग काढणेही अवघड असते. यामुळे वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. फॅन्सी नंबरप्लेट असलेले वाहन दिसतात. त्याची नंबर प्लेट पोलीस जागेवरच काढून घेतात. यानंतर 500 रुपयांचे चलन फाडले जाते.

फॅन्सी नंबरप्लेट तीन प्रकारच्या असतात, यामध्ये ठराविक नंबर घेतल्यास दादा, मामा, काका अशी मराठी अद्याक्षरे लिहता येतात. तर काही नंबरप्लेटवर एका बाजूला एखादा लोगो/डिझाइन काढून शेजारी नंबर लिहला जातो. तर काही जण इतक्‍या बारीक अक्षरात नंबर लिहतात की तो पोलिसांना किंवा सीसीटीव्हीलाही टीपता येत नाही. कायद्यानुसार नंबरप्लेटचा एक ठराविक साचा ठरलेला आहे. यामध्ये अक्षरांची साइजही ठरलेली असते. त्यानुसार नंबरप्लेट नसेल तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाईची तरतूद आहे.

-विजयकुमार मगर (उपायुक्त, वाहतूक शाखा)

Post a Comment

Previous Post Next Post