100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला

 या घटनेप्रकरणी दोघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पूण्यातील पाषाण परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला आहे. या घटनेप्रकरणी दोघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (24) यांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हॉटेलमध्ये जेवण केले. दरम्यान, त्या ठिकाणी मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर व पकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली मात्र, पंकजने पैसे नसल्याचे सांगितले. या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post