विद्यार्थ्याने शिक्षकावर शेरोशायरी केली म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : अकरावीच्या एका विद्यार्थ्याने शिक्षकावर शेरोशायरी केली म्हणून  शिक्षकाने विद्यार्थ्याला  लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.पुण्यातील आळेफाटा येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आळे येथील ज्ञानमंदिर ज्युनुअर कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पालक वर्गातून शिक्षकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाची दखल घेत कॉलेज प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावली आहे. आता कॉलेज प्रशासन आरोपी शिक्षकाविरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमके काय आहे प्रकरण..?

आळे येथील ज्ञानमंदिर ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीही शहानिशा न करता शिक्षकाने एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा-बुक्क्या घातल्या.यावेळी पीडित विद्यार्थी आपली काही चूक नसल्याचे शिक्षकाला सांगत होता. तसेच मारहाण करु नये अशी विनवणी करत होता. मात्र शिक्षकाने काहीही ऐकून न घेता विद्यार्थ्याला मारहाण करतच राहिला.

तेथे उपस्थित एका विद्यार्थ्याने मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post