संविधानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आप तर्फे तिरंगा रॅली



प्रेस मीडिया लाईव्ह :

आम आदमी पार्टी पुणे शहर तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहियानगर येथे झेंडावंदन, संविधान वाचन आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान असे कार्यक्रम झाले आणि भव्य तिरंगा रॅलीही काढण्यात आली.राज्य संघटक आणि पुणे शहर कार्याध्यक्ष श्री विजय कुंभार यांनी यावेळी झेंडावंदन करून आपले मनोगत व्यक्त केले. 

ते म्हणाले" वास्तविक पाहता इंग्रज गेल्यावर प्रजेची सत्ता यायला हवी होती पण ती या देशातील भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशाही यांनी वाटून घेतली. देशात आम आदमी पार्टी ची स्थापन याच कारणाने झाली आहे की लोकांना काय पाहिजे ते लोकांनी ठरवावे आणि आम आदमी पक्षाने ते पूर्ण करावे. राजकारण करता वेळेस संविधान सर्वोतोपरी ठेवूनच काम झाले पाहिजे तरच या देशात लोकशाही टिकेल. संविधान दिवशी स्थापना झालेला आम आदमी पक्ष लोकांना त्यांचे अधिकार, सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव काम करत राहील".

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्मानित व्यक्ती उमाकांत कांबळे (मा. उपायुक्त, समाजकल्याण), दत्तात्रय पांगारे (मा.अधिकारी राज्य कामगार विमा योजना), विक्रांत सिंग(ब्रॅड अमबॅसिटर, उत्तम वक्ता, स्वच्छता, पुणे मनपा), गिरीश पाटील(राष्ट्रीय युवा संयोजक, जलबिरादरी), एम डी जाधव(निवृत्त आर्मी आॅफिसर,  ), शशिकांत बोराटे(समाजकल्याण आयुक्तांचे सचिव), महेंद्र नामदेव रोकडे (सहाय्यक आयुक्त, मुंबई पोलीस, (निवृत्त) ), शीतल यशोधरा(सिव्हिल इंजिनियर, साहित्य क्षेत्रातील योगदान), श्वेता विनोद (लेखिका, शासन पुरस्कार सन्मानित), श्रीरंग मोहिते (28 वर्षे चळवळीत काम, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम आणि त्याच्या पुरस्काराने सन्मानित), लोहियानगर चौकी सहायक पोलीस निरीक्षक श्री विटे आणि पालिकेतील सफाई कर्मचारी यांचा पुष्प गुच्छ आणि संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

तिरंगा रॅली (बाईक, कार, रिक्षा) ची सुरुवात फुले वाडा येथून झाली, प्रथम फुले दाम्पत्य यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लक्ष्मी रोड, अलका चौक पासून परत बाजीराव रस्ता शनिवार वाडा ते पुणे पालिका इमारत येथे संपन्न झाली. पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आप वाहतूक विंगचे राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, जेष्ठ सदस्य किशोर मुजुमदार, शहर समन्वयक अभिजित मोरे, शहर संघटक एकनाथ ढोले, आम आदमी रिक्षा संघटना अध्यक्ष आनंद अंकुश, सुजित अगरवाल, शहर मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे, व्यापारी संघटना अध्यक्ष अनिल कोंढाळकर, किरण कद्रे, घनश्याम मारणे,  निरंजन अडागळे, अजय पैठणकर,शेखर ढगे, शत्रुघ्न कांबळे, ईश्वर कांबळे, असिफ भाई, मनोज फुलावरे, अतुल मडकर, सचिन कोतवाल, किरण कांबळे,  समीर आरवडे, फॅबियन अण्णा सॅमसन,   सुनीता काळे, वैशाली डोंगरे, प्राजक्ता देशमुख, सुरेखा भोसले, अमित मस्के, कृणाल घारे , मनोज शेट्टी , रामभाऊ इंगळे, स्वप्नील  गोरे,  तसेच कार्यक्रमाला शहरातील आप चे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. 



Post a Comment

Previous Post Next Post