गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : गुरूवारी (दि.19) रोजी महानगरपालिकेकडून  देखभाल-दुरुस्ती, तातडीच्या कामांसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यात शहराच्या वेगवेगळया भागात टप्प्या टप्प्याने पाणी बंद ठेवले जात होते.मात्र, आता एकाच दिवशी ही सर्व कामे केली जाणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे.

या कामात पर्वती जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्‍लब, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर, एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) परिसर व चतु:शृंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर तसेच कोंढवे – धावडे जलकेंद्र येथील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीची कामे केली जाणार आहेत.

त्यात पर्वती येथे विद्युत विषयक व अंतर्गत जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. चांदणी चौक ते वारजे येथील जलवाहिनीला गळती असून, तिची दुरुस्ती केली जाणार आहे. तर, पाणी गळती शोधणे, रोखण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येत असून हे काम याच दिवशी केले जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post