'तारक मेहता का उलटा चश्मा' मालिकेतील अभिनेता सुनिल होळकर यांचे निधनप्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : मालिका, नाटक, चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून मनोरंजन करणारा अभिनेता सुनिल होळकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

त्यांनी केलेले 'मोरया' चित्रपटामधील काम आणि 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेतील भूमिका आज देखील प्रेक्षकांच्या मनात आहेत. सुनिल होळकर लिव्हर सोरायसिस या दुर्धर आजाराने गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. अनेक उपचार करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. हा आजार असा आहे ज्यामध्ये कधीही शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुरुवारी (दि. १२) पर्यंत ते ठीक होते, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मूल असा परिवार आहे.

'मोरया', 'गोष्ट एका पैठणीची' या सारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'मि. योगी', 'मॅडम सर' अशा अनेक मालिकांतून तर 'भुताटलेला' वेब सिरीज मधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. अभिनेता, निवेदक अशी त्यांची ख्याती होती. जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post